औरंगाबाद: एका भरधाव ट्रॅकटर ने दुचाकीस चिरडले. या अपघातात 34 वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ज्यूब्लिपार्क चौकात घडली.पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन जप्त केली असून अपघातानंतर चालक पसार झाला.ज्योती दिलीप सोनवणे वय-34 (रा.गल्ली क्र-3,कैलासनगर) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
मृत ज्योती या मूळ कन्नड तालुक्यतील पिशोर गावातील रहिवाशी आहेत.मागील अनेक वर्षांपासून ते शहरात वास्तव्यास आहे. त्या गावातील एका रुग्णांना भेटण्यासाठी भाचा चंद्रकांत हिवाळे सोबत त्याच्या दुचाकी(एम.एच.20 ए ई1612) या वरून घाटी रुग्णालयात गेल्या होत्या. तेथून भेट घेतल्यानंतर ते घरी कैलासनगरकडे जात असताना ज्यूब्लिपार्क चौकात भरधाव वेगात जाणाऱ्या (एम.एच 21ए एन0848) या पाण्याच्या टँकर ने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरधार धडक देत दुचाकी चिरडली. या अपघातात ज्योती यांचा जागीच मृत्यू झाला. डोक्यातून आणि नाका-कानातून रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून टँकर चालकाने टँकर सोडून तेथून पळ काढला.या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकर ताब्यात घेतले आहे.पोलीस चालकाचा शोध घेत आहे.